बीड

आज अंबेवडगाव येथील २०स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा.


धारूर तालुक्यातील २० जणांचे स्वॅब घेऊन ते लातुर येथील लॅबला तपासणीसाठी पाठवले असल्याची तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सचिन शेकडे यांनी माहिती दिली.
धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील एका व्यक्तीचा कोरोना पाॅझीटीव्ह रिपोर्ट आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन, या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या कांही व्यक्तींचे स्वॅब धारूर तालुका आरोग्य विभागाने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले. यात शनिवारी १४ जणांचे स्वॅब घेतले होते. त्यातील अंबेवडगाव येथील दोन महिलांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आले आहेत. तर रविवारी २०जणांचे स्वॅब घेऊन ते लातुर येथील विलासराव देशमुख तपासणी लॅबला पाठवले असुन, या रिपोर्टच्या निकालाची धारूर तालुक्यातील नागरिकांना प्रतिक्षा लागुन राहिली असुन, या २० जणांचे रिपोर्ट सायंकाळी येतील. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सचिन शेकडे यांनी दिली. या २० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह यावेत. अशी प्रार्थना तालुक्यातील नागरिक करत आहेत.