रुग्णालयास आग! 8 मृत्यू, 8 जखमी; मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 Aug :- जबलपूरच्या शिवनगर येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी आग लागली. या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याने लोकांना बाहेर पडता आले नाही. आग इतकी मोठी होती की, धुराचे लोळ खूप दूरपर्यंत पसरले होते. या आगीमुळे रुग्णालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीत पाहता पाहता रुग्णालयाचा बराच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी आला. तीन मजली इमारत आगीत जळून खाक झाली. या आगीचे किटाळ लांबपर्यंत उडत होते. तर परिसरात धुराचे लोट आणि आगाच्या ज्वाळा रौद्र रुप धारण करून होत्या. या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करत या घटनेप्रकरणी दु: ख व्यक्त केले. राज्य सरकार मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले की, जबलपूर येथील रुग्णालयात भीषण आग लागल्याची दु:खद बातमी मिळाली. मी स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्या सतत संपर्कात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. न्यू लाईफ हॉस्पिटल, जबलपूर येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मौल्यवान जीवांचा अकाली मृत्यू झाल्याच्या बातमीने मन दुखावले आहे.
मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि हे नुकसान सहन करण्याची आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची कुटूंबियांना शक्ती देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या दु:खाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबाने स्वतःला एकटे समजू नये, मी आणि संपूर्ण मध्यप्रदेश कुटुंबासोबत आहोत. जखमींच्या संपूर्ण उपचाराचा खर्चही सरकार उचलणार आहे, असे ते म्हणाले.