महाराष्ट्र

अखेर राज्यपालांनी मागितली माफी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Aug :- आर्थिक राजधानी मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर टीकेची झोड उठली. या वक्तव्याबाबत राज्यपालांनी आता माफी मागितली आहे. मुंबईत राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात राज्यपालांनी मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य केले होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते की, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”

या विधानाद्वारे त्यांनी एकप्रकारे मराठी माणसांनाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठीमन पेटून उठले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी विरोधी पक्ष विशेषतः सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटानेही त्यांच्या या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

महाराष्ट्र व मुंबईच्या विकासात मराठी माणसांचे सर्वाधिक योगदान असल्याचे हे पक्ष म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करत त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले. यामुळे या वादावर पडदा पडला.