महाराष्ट्र

शाळेत हातबॉम्ब सापडल्याने खळबळ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 July :- सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुडनूर या गावात मराठी मुलांच्या शाळेमध्ये हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी चेंडू खेळत असताना तो खिडकीतून आत गेल्याने ते आणण्यासाठी खोलीत गेले होते, तेव्हा त्यांना बॉम्ब आढळून आला.

यानंतर याबाबत विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. ही माहिती उपसरपंच गुलाब पांढरे यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम यांना सांगितले आणि पोलीस पाटील यांनी जत पोलीस यांना कळवल्यानंतर तत्काळ पोलीस पथक व सांगलीतील बॉम्ब पथक शाळेत दाखल झाले. या अगोदर २०१७ मध्ये कुडनूरमध्ये दोन बॉम्ब सापडले होते.

बॉम्ब पथक आणि सांगली पोलीस व त्यांची टीम लिओ डॉग हे घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर बॉम्ब ताब्यात घेऊन याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सांगलीला रवाना झाले. त्यामुळे डफळापुर कुडनूर व जत तालुक्यात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.