महाराष्ट्र

बच्चू कडूंचे धक्कादायक विधान! म्हणले, आमचे ४० आमदार परत गेले तरी…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 July :- “आमचे ४० आमदार परत गेले तरी राज्य सराकारला धोका नाही. भाजपा आणि अपक्ष आमदार मिळून सरकार बनवू शकतात, असं धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी कुणाचीही भीती नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे.” असं म्हणत बच्चू कडू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना टोला लगावला आहे.

सरकार कोसळण्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला” असल्याची टीका पटोलेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली होती. दोनच मंत्र्यांचे असलेले शिंदे -फडणवीस सरकार अपंग असल्याची टीका पटोले यांनी केली होती. दिव्यांगाना कमजोर समजणे हा पटोले यांचा नासमजपणा आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम असल्याचा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे. नानांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मंत्री आहेत. मात्र, ते राज्याचा कारभार सांभाळण्यास सक्षम आहे. काही अडचणींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला गेला. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे काहीही नुकसान झालेले नाही. राज्यसरकारने शेतकऱ्यांसाठी विविध सवलतीच्या घोषणा केल्या आहेत. जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही पहिला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू आणि मग सरकारच्या, अशी ग्वाही बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना दिली आहे.