News

एकच हायवा ट्रक आठवडा भरात दूसऱ्यांदा पकडला


 पोलिसांकडून वाळु चोरी विरोधात धाडसी कारवाई 
24 लाखांचा मुद्देमाल जप्त 

पैठण ( प्रतिनिधी)तालुक्यातील विहामांडवा परिसरातील तुळजापूर शिवारात विरभद्रा नदीच्या पात्रामध्ये मजुरांच्या साहाय्याने वाळू भरली जात असल्याची गोपनीय माहिती पैठण पोलिसांना मिळाली असता उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुठाळ,गाणगिने, पो.ना. पठाण यांच्या गस्ती पथकाने सापळा रचून हायवा व ट्रॅक्टर अशी दोन वाहने पकडली . पोलिसांना बघताच दोन्ही वाहनांचे चालक- मालकांनी वाहने घटना स्थळी सोडून पलायन केले आहे.याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात दोन्ही वाहनांवर व त्यांच्या चालक- मालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून 24 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विशेष म्हणजे सहा दिवसांपूर्वी देखील पैठण तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा  बेकायदा वाळूने खचाखच भरलेला हायवा ट्रक पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस पथकाने धाडस दाखवून पकडला होता. न्यायालयातून सुटका झाल्यावर या हायवातुन पून्हा वाळू चोरी सुरू होताच उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवरील पोलिस पथकाने थेट धाडसत्र राबवून याच हायवा ट्रकला पोलिस ठाण्याचा रस्ता दाखविला.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विहामांडवा परिसरातील तुळजापूर शिवारात असलेल्या विरभद्रा नदीच्या पात्रात हायवा व ट्रॅक्टर भरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानूसार तुळजापूर शिवारातील विरभद्रा नदी पात्रात शुक्रवार दि 5 जून रोजी रात्री 12 वाजता पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला .  दरम्यान मजुराच्या साहाय्याने वाहनात वाळू भरली जात असल्याचे दिसून आले. पोलिसांना पोहचेपर्यंत हायवा वाहन व ट्रक्टर चे चालक मालका सह मजूर पसार झाले. पोलिसांनी हायवा वाहन क्रमांक एम एच 20 इ एल 7677 व महिंद्रा अर्जुन ट्रक्टर  व ट्रॉली क्रमांक एम एच 20 एफ जी 7604 यांना ताब्यात घेत पैठण पोलीस ठाण्यात आणून दोन्ही वाहनांच्या चालक मालकांवर गुन्हा दाखल केला यातील  आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या आधी दि. 31 मे च्या मध्यरात्री पोलिसांनी यातील वाळुचा हाच  हायवा ट्रक पकडला होता. पैठण तालुक्यातील नदी पात्रातून वाळुचा बेकायदा उपसा व चोरी छूपके वाहतूक होऊ नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षका डॉ मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र गत आठवडाभरापासून पहायला मिळत आहे. महसूल प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून चर्चिले जात आहे.