महाराष्ट्र

शिंदे गटाची उद्धव ठाकरेंनाच ऑफर! आमच्यासोबत या, शेवट गोड करू…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 July :- आम्ही शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली, त्यात आम्ही पक्षप्रमुख पदावर कुणाची नियुक्ती केली नाही. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि पक्षप्रमुखपद स्वीकारावे अशी ऑफरच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. आम्हाला या सर्व गोष्ट्रीचा शेवट गोड व्हावा असे वाटते आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख पदापेक्षा राज्याचे मुख्यमंत्रिपद मोठे आहे. असेही दीपक केसरकरांनी म्हटले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंपेक्षा पक्षात एकनाथ शिंदेंना बंडखोर आमदारांनी मोठे पद अन् मान दिल्याचेही एका शब्दांत दिसून आले.

माजी मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करणे हे अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून शुभेच्छा देताना तसा उल्लेख केला पक्षप्रमुख पद हे पक्षापूरते मर्यादित असते तर मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी असते असे म्हणत हे मुख्यमंत्रिपद हे शिवसेना प्रमुख पदापेक्षा मोठे पद असल्याचा टोला केसरकरांनी लगावला आहे. यामुळे गैरसमज करून घेऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्व जपता आले पाहिजे असा टोमणा लगावला आहे. तर आज बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या पुन्हा निवडणूक लढवण्याचा मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरेंनी निवडून येण्यासाठी मतदारसंघातील 2 माजी आमदारांना विधान परिषदेचे सदस्य करावे लागले यातच सगळे आल्याची खरपूस टीका दीपक केसरकरांनी केली आहे.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही ज्यांच्या सोबतीने मते मागितली होती. त्यांच्यासोबत गेलो आहोत. शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले असले तरी तुम्ही त्यांच्यासोबत राहिला नाहीत. महाविकास आघाडी तयार केल्यानंतर तुम्ही जनतेसमोर गेले नाही. आम्ही मुळ विचारधारेसोबत गेलो आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलो आहोत. आमच्यासोबत असलेल्या आमदारांची मतदारसंघात वेगळी ओळख आहे. त्यांच्या स्वत:च्या छबीवर ते निवडून आले आहे.