क्राईमबीड

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ : आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि. 26 जुलै :- ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रु घेऊन ये; म्हणून एका विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी तिचा नवरा सासू सासरे यांच्यासह आठ जणां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, सांगवी (सा.) येथील सुनिता हिचे लग्न दि. १९ जानेवारी २०२० रोजी धारूर तालुक्यातील मैंदवाडी येथील अशोक रणजित मैंद यांच्या सोबत झाले. लग्नानंतर आठ महिने तिला चांगले नांदवले. नंतर तिचा नवरा व कुटुंबातील सर्वजण तिला तू अपंग आहेस. तुला काम येत नाही. तसेच तुझे लग्ना पूर्वीच अशोक मैंद याच्याशी शारीरिक संबंध आले असल्याने; कारवाई टाळण्यासाठी लग्न केले. असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला मारहाण केली. तसेच ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रु.ची मागणी केली. तिच्या वडिलांनी पैसे देऊनही मारहाण करून तिच्या १४ महिन्याच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली.

या प्रकरणी सुनिता मैंद हिने दि. ३१ मे २०२२ रोजी तिच्या सासरच्या लोका विरुद्ध केज येथील कौटुंबिक हिंसाचार व महिला समुपदेशन केंद्र केज येथे तक्रार दिली होती. त्या वरून तिने दि. २५ जुलै रोजी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून तिचा नवरा अशोक रंजीत मैंद, सासु रत्नमाला रंजीत मैद, सासरे रंजीत लक्ष्मण मैद, दिर अजित रंजीत मैंद, चुलत सासरा संजीवन लक्ष्मण मैंद, चुलत सासु सविता संजीवन मैद सर्व रा. मैंदवाडी ता. धारूर आणि नणंद राधा शेषेराव बिक्कड, नंदावी शेषेराव काशीनाथ बिक्कड रा. सांगवी ता. केज या आठ जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ३१६/२०२२ भा. दं. वि. ४९८(अ), ३२३, ५०४ ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.