बीड

गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या!

बीड.दी 6 प्रतिनिधी : बार्शी नाका परिसरातील विद्यार्थीनीने घरातील आडूला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकिस आली. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पेठ बीड पोलिस दाखल झाले होते.
साक्षी गायकवाड वय 17 रा.प्रकाश आंबेडकर नगर. बार्शी नाका असे गळफास घेऊन आत्महत्त्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. तिच्या राहत्या घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी मृतदेह अढळून आला.रात्री केव्हातरी तिने गळफास घेतला असाव असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गळफास घेण्याचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी पेठ बीड पोलिस ठान्याचे पोलिस निरिक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शववीछेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.