‘या’ कारणामुळे फुटली शिवसेना; राज ठाकरेंचा घणाघात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 July :- राज ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हते. शिवसेकडे एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत माणसं एका विचाराने बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत एक विचार होता आणि त्या विचारानं माणसं बांधलेली होती.’
‘मला भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस घरी आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका. ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली, ती ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शहांनी घडवली, ना भाजपाने, ना अजून कोणी. शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरेंनाच जाते. हे एकदा घडलेलं नाही. आज आमदार बाहेर पडले, तेव्हा मी बाहेर पडलो होतो. तेव्हाची व आताची कारणे एकच आहेत,’ असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
‘संजय राऊतांमुळे सेनेत बंडखोरी झाली नाही. त्यांचा यात काय संबंध? ते रोज सकाळी टीव्हीवर येतात, अहंकारात काहीतरी बोलतात. त्याला लोक वैतागलेत. ते तेवढ्यापुरतं होतं. त्यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नाहीत,’ असे राज म्हणाले. ‘सद्यस्थितीत ‘मातोश्री’ संकटात असल्याचा दावा केला जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. मातोश्री एक वास्तू आहे. त्यावर कोणतेही संकट नाही. वास्तू व संघटना वेगळी असते. सध्या संघटना म्हणजे शिवसेना लयास जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,’ असे राज म्हणाले.