महाराष्ट्र

आमदार रमेश बोरनारे यांचा गौप्यस्फोट!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 July :- औरंगाबादचे माजी पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई हे विकास निधीसाठी जिल्ह्यातील आमदारांकडून 10 टक्के कमीशन घ्यायचे, असा गौप्यस्फोट वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी केला आहे. 1 कोटींचा निधी दिला तर ते त्यासाठी 10 लाख रुपये कमीशन मागायचे, त्यांनी माझ्याकडून 10 टक्क्यांचे कमीशन घेतले, असा आरोप बोरनारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

पुढे बोलताना बोरनारे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना विकासनिधीसाठी शिवेसेना नेत्यांकडून नेहमीच आडकाठी केली गेली, त्यामुळे राज्यभरातील शिवसेना आमदारांनी उठाव केला. आम्हाला जिथे अडचण आली, त्यावेळी आम्ही एकनाथ शिंदेंकडे तक्रार करायचो, त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही बाहेर पडलो. आमच्यावर ठाकरे कुटुंबीयांनी काही जरी आरोप केले तरी आम्ही काही बोलणार नाही, आमच्यावरील होणारा अन्याय एकनाथ शिंदे यांनी दूर केला.