News

कोरोना पॉझेटिव्ह महिलेने दिला मुलीला जन्म, नावं ठेवलं ‘सॅनिटायझर’!

इंदूर 6 जून: कोरोना व्हायरसने सगळ्या देशात भीतीचं वातावरण आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारची चिंता वाढत आहे. अशा वातावरणात लोक आता परिस्थितीशी जुळवून घेत असल्याचं पुढे येत आहे. मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं कोरोना पॉझिटिव्ह महिलेने एका मुलाला जन्म दिला आणि तिचं नाव सॅनिटायझर असं ठेवलं. सगळ्या हॉस्पिटलची ती चिमुकली आता लाडकी झाली आहे.

इंदूरमधल्या राहणाऱ्या भारती यांच्या कुटुंबातले सर्वच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात घरातल्या सर्वात वृद्ध सदस्याचा मृत्यूही झाला.  कुटुंबातले सगळेच सदस्य क्वारंटाइन असतानाच त्यांना नववा महिना लागला होता. शहरातल्या इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना भरती करण्यात आलं.

भारती यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी आपल्या या चिमुकलीचं नावं सॅनिटायझर असं ठेवलं. असं नाव ठेवायला सुरुवातीला त्यांच्या पतीने त्यांना विरोध केला होता.

मात्र भारती यांच्या हट्टापुढे त्यांचं काहीही चाललं नाही. आत  कुटुंबातल्या सगळे सदस्य हे कोरोनामुक्त झाले असून सात दिवसानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टीही देण्यात आली आहे. त्यांना जेव्हा डिस्जार्च देण्यात आला तेव्हा सगळं हॉस्पिटलच या चिमुकलीला निरोप द्यायला हजर झाले होते.