बीड

अष्टपैलू रिद्धी किन्हीकरचे सीबीएसई बोर्ड १० वी परीक्षेत घवघवीत यश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 July :- दहावी सीबीएसईचा निकाल कधी जाहीर होणार यासंदर्भात विद्यार्थी, पालकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. सीबीएसई बोर्डाचा इ. दहावीचा निकाल काल दि. 22 जुलै रोजी जाहीर करण्यात आला. बीड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील अष्टपैलू विद्यार्थीनी रिद्धी किन्हीकरने सीबीएसई बोर्ड दहावीच्या परीक्षेत ९७.८० % गुण मिळवत नेत्रदीपक यश मिळवले आहे. पोदार शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या निकालात रिद्धी किन्हीकरने ९७.८० % मिळवत शाळेतून चौथा क्रमांक प्राप्त करत बाजी मारली आहे.

बीड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ गिरीश किन्हीकर आणि डॉ अश्विनी किन्हीकर यांची मुलगी रिद्धी किन्हीकर शैक्षणिक गुणवत्तेत नेहमी अग्रस्थानी असायची तर याबरोबरच नृत्य,नाट्य, गायन, वक्तृव अशा विविध शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात देखील रिद्धी किन्हीकरचा सातत्याने पुढाकार असायचा. रिद्धी किन्हीकरच्या या कौतुकास्पद कामगिरीचे अभिनंदन पोदार शाळेच्या प्राचार्या, शिक्षकवृंद व पालकांनी केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर याबरोबरच विविध क्षेत्रातून देखील रिद्धी किन्हीकरचे कौतुक केले जात आहे.