महाराष्ट्र

शिंदे गटाच्या आ. कांदेंना युवासेनेने पिटाळले; शिवसैनिक आक्रमक होताच…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 July :- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांत खटके उडण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे गुरूवारी सेना नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्याच्या ताफ्यामागे मनमाडच्या दिशेने निघाले. पण, रस्त्यात पिंपळगाव टोलनाक्याजवळ युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा मार्ग रोखून त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. यावेळी कांदेंनी गाडीच्या खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिकांचा रोष पाहता पोलिसांनी त्यांना तेथून जाण्याची सूचना केली. त्यानुसार कांदेंनीही तेथून काढता पाय घेणे पसंत केल्याने एक मोठा प्रसंग टळला.

गेल्या महिन्याभरापासून राजकारणातील सत्ता संघर्ष सोबतच आमदार व कार्यकर्त्यांमधील दरी वाढताना दिसत आहे. शिवसेनेतून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांच्यासाेबत त्यांच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या 40 आमदारांमध्ये सहभागी असलेले कांदे यांनी सेनेच्या वरिष्ठ नेत्यांविराेधात वक्तव्य करीत आव्हान दिल्याने ls चर्चेत आहेत.

दाेन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने जिल्हा दाैऱ्यावर आलेल्या युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखाेरांना आव्हान देत त्यांच्या मतदारसंघात पर्यायी यंत्रणा उभी केली आहे. याच निमित्ताने ठाकरे हे गुरूवारी कांदे यांच्या मतदारसंघातील मनमाड येथे शिवसैनिकांचा मेळाव्यासाठी जात हाेते. तत्पुर्वी कांदे यांनी माध्यमांच्या मार्फत पत्रकार परिषद घेवून आपण आदित्य ठाकरे यांची भेट घेवून आमचे काय चुकले? असा सवाल करणार असल्याचे जाहीर केले होते.

या पार्श्वभूमीवर कांदे व ठाकरे आमने सामने येण्याची चिन्हे निर्माण झाली हाेती. त्याचवेळी ठाकरे यांच्या स्वागतासाठी माजी आमदार अनिल कदम हे कार्यकर्त्यांसाठी जमले हाेते. त्याचवेळी कांदे हे टाेल नाक्यावरून जात असताना त्याचवेळी निफाड तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदे यांच्या माेटारीसमाेर जाऊन घाेषणाबाजी केली. उद्धव ठाकरे अंगार है, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशी जोरदार घोषणाबाजी शिवसैनिक करीत होते. हे बघून कांदे यांनी गाडी थांबविली.

कार्यकर्ते समाेर येताच वाद हाेण्याचे शक्यता लक्षात घेता वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी कांदे यांना भेटून येथे न थांबण्याचे व कारमध्येच बसण्याचे सांगितले. यानंतर पुन्हा कांदे यांनी गाडीत बसताच पुन्हा घाेषणाबाजी करीत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदे यांच्यावर गद्दारीचा आराेप केला यावेळी कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. कांदे तेथून निघाल्यानंतर आमची ताकद बघून पळ काढल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. या घटनेवरून टाेल नाक्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद टाळला.