बीड

रुपाली पाटील चित्रा वाघ यांच्यावर संतापल्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 July :- भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधला. तसेच ट्विटरवर नाना पटोले यांना टॅग करत “नाना तुम्ही पण झाडी, डोंगर, हॉटेलमध्ये” असा खोचक प्रश्न केला.

या ट्वीटनंतर चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी “तुम्ही ब्लू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि याचं उत्तर मागाल, असं करतात का” असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “महिला म्हणून राजकारणात काम करताना आपली जबाबदारी वाढते. आपण अधिक संवेदनशीलपणे वागलं पाहिजे. नाना पटोले यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाप्रमाणे गुन्हा दाखल करावा.

कुणालाही कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यातील व्हिडीओ टाकण्याचे अधिकार नाहीत. लग्न झालेलं जोडपे हनिमुनला गेले तर ते हातात हात घातल्याचे, जवळ उभे असल्याचे फोटो टाकतात. थेट हनिमुन होतानाचे व्हिडीओ टाकत नाही हे चित्रा वाघ यांनी लक्षात घ्यावं.”