महाराष्ट्र

13 वा खासदार शिंदे गटात जाण्याची चर्चा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 July :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन राजकीय जीवनात पुन्हा एकदा सक्रिय व्हावे यासाठी शुभेच्छाही दिल्या. गेल्या आठवड्यात कीर्तिकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याने रहेजा रुग्णालयात त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती.

यानंतर तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी कीर्तीकर यांना दिलेला होता. ही शस्त्रक्रिया होऊन नुकतेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात आल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपल्या समर्थक आमदारांच्या सोबत जाऊन त्यांच्या निवासस्थानी तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदेंसोबत आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शिवसेना पक्षातील आमदार आणि खासदार फोडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाविरोधात शिवसैनिक तीव्र नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपण शिवसेनेतच असल्याचा दावा करत आहे. आज त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे जुने साथीदार आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे.