महाराष्ट्र

द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती; तिसऱ्या फेरीतच 5.77 लाख मतांनी विजयी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 July :- केंद्रातील सत्ताधारी NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती होतील. त्या या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचणाऱ्या देशाच्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील. गुरूवारी सकाळी 11 वा. सुरू झालेल्या मतमोजणीत मुर्मूंनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा तिसऱ्या फेरीत पराभव केला.

मुर्मू यांना तिसऱ्या फेरीतच विजयासाठी आवश्यक 5 लाख 43 हजार 261 मते मिळाली. या फेरीत त्यांना 5 लाख 77 हजार 777 मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना केवळ 2 लाख 61 हजार 62 मते मिळवता आली. यात राज्यसभा व लोकसभेच्या खासदारांसह 20 राज्यांतील मतांचा समावेश आहे. उर्वरित राज्यांची मतमोजणी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुर्मू यांच्या घरी जावून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे, यशवंत सिन्हा यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. मुर्मूचे अभिनंदन करताना ते म्हणाले –’द्रौपदी मुर्मू यांना विजयाच्या शुभेच्छा. देशाला आशा आहे की प्रजासत्ताकच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून त्या न घाबरता किंवा भेदभाव न करता संविधानाच्या संरक्षक म्हणून काम करतील.’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले- ‘राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रभावी विजय मिळवल्याबद्दल द्रौपदी मुर्मूंना शुभेच्छा. त्यांनी गाव पातळीवरील गरीब व वंचितांसह झोपडपट्ट्यांतही लोककल्याणाचे सक्रिय कार्य केले आहे. आज त्या त्यांच्यातून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचल्यात. भारतीय लोकशाहीची ही ताकद आहे.’