महाराष्ट्र

नाना पटोलेंचा धक्कादायक विडिओ…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 July :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक धक्कादायक व्हिडीओ ट्विट करून आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपाच्या फैरी झाडल्यात. लोकप्रतिनिधींचे असे वर्तन राहिले, तर काय बोध घ्यावा, असा सवालही त्यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही अतिशय तीव्र शब्दांत टीका केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन छेडले. मात्र, आता सध्या नाना एका अतिशय नाजुक प्रकरणात अडकल्याचे समोर येत आहे. त्याचा व्हिडीओ चित्रा वाघ यांनी ट्विट केला आहे. त्यात व्हिडीओला काय झाडी, काय डोंगार, का हॉटेल या गाण्याचे पार्श्वसंगीत आहे. त्यात सुरुवातीला नानांचा टी शर्ट आणि पँट घातलेल्या वेशात फोटो येतो. त्यानंतर नाना एका महिलेच्या खांद्यावर हात टाकून बसलेले दिसतायत. पुढे एका हॉटेलाचाही फोटो येतो. त्या फोटोवर हेच ते पोलो ओरचिड हॉटेल. जिथे नानांचा ओके कार्यक्रम चालू होता, अशा ओळी आहेत.

मेघालयातील चेरापुंजीतील एका हॉटेलमध्ये काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एका महिलेसोबत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होतांना दिसत आहे. मात्र हे सर्व भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. त्या फोटोवर हेच ते पोलो ओरचिड हॉटेल. जिथे नानांचा ओके कार्यक्रम चालू होता, अशा ओळी आहेत.

नाना पटोलेंनी मात्र, या आरोपांचा इन्कार केला आहे. हा व्हिडिओ आपला नाही. तो मॉर्फ केलेला असून, यामागे भाजपचे कारस्थान आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. दरम्यान, या व्हिडीओची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानंतर विशेष म्हणजे चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोलेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या. लोकप्रतिनिधींच्या अशा वर्तनापासून काय बोध घ्यावा, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, नानांच्या या व्हिडीओवर नाना मिम्स नेटकऱ्यांनी केले आहेत. हे मिम्स चांगलेच व्हायरल झाले आहेत.