महाराष्ट्र

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 July :- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना फोन टॅपींगप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली. यापूर्वी पांडे यांची ईडीने चौकशी केली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. एनएसई फोन टॅपींग प्रकरणी संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

ईडीने बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याकरिता दिल्लीतील ईडी कार्यालयात आज हजर राहण्यासाठी त्यांना समन्स पाठवले होते. गत आठवड्यातदेखील ईडीने संजय पांडे यांची चौकशी केली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत.