बीड

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अक्षय पवार यांच्याकडून गेवराईतील पत्रकारांना अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

गेवराई ( प्रतिनिधी ) कोरोना रोगाच्या संकटात अहोरात्र वृत्त संकलन करून, नागरिकांना कोरोना रोगाच्या तसेच विविध विषयाच्या बातम्या देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालुन काम करणा-या पत्रकार बांधवांना कोरोना विषाणूपासुन बचावसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसच्या वतीने पत्रकार बांधवासाठी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्याचे वाटप दि 5 जून शुक्रवार रोजी सकाळी येथील पत्रकार भवनात करण्यात आले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांच्या वतीने, माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त,
देशाचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांना कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र वृत्त संकलन करून आपल्या पर्यंत बातम्या देण्याचे काम करत आहेत. त्यांना कोरोना विषाणूपासुन बचाव व संरक्षण करण्यासाठी व प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 च्या होमिओपॅथी गोळ्याचे वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार याच्यां हस्ते गेवराई पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांना या गोळ्याचे वाटप करण्यात आले.यावेळी गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, उपाध्यक्ष दिनकर शिंदे, संतोष भोसले, अयुब बागवान, सुभाष सुतार, गणेश क्षिरसागर, राजेंद्र बरकसे, सखाराम शिंदे, कैलास हादगुले, जुनेद बागवान, भागवत जाधव, वैजिनाथ जाधव, प्रसाद कुलकर्णीसह राष्ट्रवादीचे जयसिंग माने, शेख मोहसिन, अमित वैद्य, भागवत दहिवाळ आदी उपस्थित होते.