बीड

बीडमध्ये दिवसाढवळ्या तरूणाचा निर्घृण खून

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 July :- बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात दिवसाढवळ्या एका तरूणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. घटनास्थळी संबंधित ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून मारेकरी तरुण घटनास्थळीच उभा होता.

खंडेश्वरी रोडच्या परिसरामध्ये आज दुपारी एका तरूणाला काही तरूणांनी बेदमपणे मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला. सदरील हा खून दगडाने ठेचून केल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते. मयत तरुणाचे नाव निष्पन्न झालेले नव्हते. सदरील हा खून नशा करण्यावरून झाला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तरूणाचा खून करणारा एका जणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरील हा मारेकरी घटनास्थळावरच उभा होता असल्याचे सांगण्यात आले.