महाराष्ट्र

ठाकरेंना मोठा धक्का! आता शिवसेनेचे 13 खासदारही शिंदे गटात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 July :- चाळीस आमदारांच्या बंडानंतर अवघ्या तीन आठवड्यांत शिवसेनेत दुसरे बंड उफाळले आहे. शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करून बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली असून दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, नवीन बदलात शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावला नाही हे विशेष. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटाच्या आमदारांची सोमवारी बैठक झाली.

आमदारांच्या बैठकीत सेनेचे १४ खासदार ऑनलाइन उपस्थित हाेते, असा शिंदे गटाने दावा केला आहे. तूर्तास १३ खासदार शिंदेंसोबत असल्याचे कळते. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नेमणूक केली जाणार आहे. लोकसभेतील प्रतोदपदी भावना गवळी यांना कायम ठेवले जाणार आहे. रात्री उशिरा शेवाळे आणि हिंगोली खासदार हेमंत पाटील यांनी लाेकसभा अध्यक्षांची भेट घेतल्याचे कळते.

शिंदेंच्या कार्यकारिणीत नेतेपदी रामदास कदम व आनंदराव अडसूळ यांची निवड झाली. उपनेतेपदी यशवंत जाधव, गaुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री दिल्लीला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची भाजप श्रेष्ठींशी चर्चा करणार असून शिवसेना खासदारांना घेऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते.