CM शिंदेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका; 941 कोटींच्या कामांना स्थगिती!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 July :- 941 कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. यामुळे हा विरोधी पक्षनेते अजित पवारांना धक्का मानला जात आहे. असे असताना मात्र शिवसेनेच्या आमदारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला आहे.
मार्च 2022 ते जून 2022 या काळात मविआ सरकारने हा निधी मंजूर केला होता. मात्र, आता अजित पवारांच्या मतदारसंघात कामांना ब्रेक लागणार आहे. यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधीलाही स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारने यापूर्वीही अशी भूमिका महानगरपालिकेच्या निधी संदर्भात घेतली होती.
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेली कामे यांना एकनाथ शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आली नाहीये. सत्तांतर झाल्यानंतर शिंदेंकडून मविआ सरकारच्या निर्णयावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. एका निर्णयातून नव्या सरकारने दोन ठिकाणी निशाणा लावला आहे.
शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नव्हता असा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड केले होते. मात्र विधानभवनातील भाषणात अजित पवारांचे शिंदेंनी खूप कौतुक केले होते. यानतंर मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती दिली असून यातून नाराज गटाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.