भारत

उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 July :- उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांनी कंबर कसली असून, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विरोधकांची दिल्लीत बैठक झाली. त्यात विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर एनडीएकडून जगदीप धनकड यांना काल रात्री उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवार असतील. 80 वर्षीय अल्वा या गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडचे राज्यपाल राहिल्या आहेत. त्यांच्या नावाची घोषणा विरोधकांच्या वतीने शरद पवार यांनी केली.

याआधी शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले होते. धनखर हा मूळचे राजस्थानमधील झुंझुनूचे आहेत. दिल्लीत झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी धनखड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते.