बीड

बीडजिल्ह्यात आज २ रुग्ण पॉझिटिव्ह

किल्लेधारूर दि.६(प्रतिनिधी) तालुक्यातील अंबेवडगाव येथील रुग्णाच्या संपर्कात किल्लेधारुर व माजलगांव मधील ५९ लोक आले होते.यातील १४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. आज १७ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
तालुक्यातील अंबेवडगाव येथील मुंबईहून आलेल्या एका संशयिताचा अहवाल काल पॉझिटीव्ह आला होता. यामुळे अंबेवडगाव गाव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आरोग्य विभागाने शोध घेतला असुन गावातील ३१ जण रुग्णाच्या संपर्कात होते. यापैकी जवळून संपर्कात आलेल्या कुटुंबातील १४ जणांचे अंबाजोगाई येथून स्वॅब नमुने आज सकाळीच लातुरला पाठवण्यात आली होती. त्यांचा अहवाल आला असुन यात २ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. यातील दोघांचे स्वॅब पुन्हा घेण्यात येणार आहेत. तर १७ लोकांचे स्वॅब आज पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली..