शिवसेनेच्या बंडखोर नेत्याला थेट उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
16 July :- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना वाढता पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळेच आता भाजपाचे आपला मोर्चा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे वळवल्याचं चित्र दिसत आहे. आज सायंकाळी पाच वाजता दिल्लीमध्ये होणाऱ्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये एका मराठी नावाचाही समावेश आहे.
देशाच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. लोकसभा व राज्यसभेच्या एकूण ७८८ खासदारांमधून उपराष्ट्रपतींची निवड होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक स्वबळावर जिंकण्याऐवढी भाजपाकडे मते नसल्याने प्रादेशिक पक्षांची मदत घेण्यात येत आहे. पण उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळेच आजच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये भाजपा उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित करणार असल्याचं मानलं जात आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेले माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्याचप्रमाणे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाचीही चर्चा उपराष्ट्रपती पदासाठी केली जात असल्याचे समजते. न्यू इंडियन एक्सप्रेसने संभाव्य उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या यादीत प्रभू यांच्या नावाची चर्चा केंद्रीय नेतृत्वाकडून सुरु असल्याचं म्हटलंय.
नक्वी यांचं नाव आघाडीवर असलं तरी सुरेश प्रभू, हरदीप पुरी, एस. एस. आहलुवालीया या तीन नावांचीही केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. याच चार नावाप्रमाणेच आरिफ आरिफ खान, नजमा हेपतुल्ला, कॅप्टन अरमिंदर सिंग, आनंदीबेन पटेल या नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाला मित्रपक्षांची गरज पडणार नसल्याने संसदीय समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊन शकतो.
नक्वी यांचं नाव आघाडीवर असलं तरी सुरेश प्रभू, हरदीप पुरी, एस. एस. आहलुवालीया या तीन नावांचीही केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. याच चार नावाप्रमाणेच आरिफ आरिफ खान, नजमा हेपतुल्ला, कॅप्टन अरमिंदर सिंग, आनंदीबेन पटेल या नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाला मित्रपक्षांची गरज पडणार नसल्याने संसदीय समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊन शकतो.
राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वाने ४० बंडखोर आमदारांसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेताना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. त्याचप्रमाणे प्रभू यांची निवड उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून झाली तर पुन्हा एकदा भाजपा शिवसेनेच्या बंडखोर नेत्याला देशातील दुसऱ्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी देण्याचा योग जुळून येईल. २०१४ रोजी सुरेश प्रभूंनी शिवसेनेमधून भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांची वर्णी थेट रेल्वेमंत्री पदावर लागली होती. सध्या ते आंध्र प्रदेशमधून भाजपाच्या जागेवर राज्यसभेत खासदार आहेत.