महाराष्ट्र

इमारत कोसळली; 5 सेकंदांत होत्याचे नव्हते झाले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 July :- अमरावती शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या गांधी चौक ते रवी नगर मार्गावरील एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही इमारत शिकस्त नव्हती किंवा तिचे बांधकामही फार वर्षांपूर्वी झालेले नव्हते. मात्र, अचानकपणे ही इमारत कशी कोसळली असा प्रश्न मनपा प्रशासनासोबत स्थानिकांमध्ये चर्चिला जात आहे.

कोसळलेल्या इमारतीत एक दूध डेअरी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री आणि रिपेरिंगचे दुकान होते, तसेच वरच्या माळ्यावर अन्य दोन दुकाने होते, असे एकूण चार दुकानांची ही इमारत गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कोसळली. इमारत कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दूध डेअरीतील सर्व साहित्य तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इमारत पडल्याची माहिती मिळाल्याबरोबर महानगरपालिकेचे पथक तसेच पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. ही इमारत मुख्य मार्गावर असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.