महाराष्ट्र

शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार; केसरकरांचा गंभीर आरोप

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 July :- शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. तर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनीच मदत केली, असा गंभीर आरोप केसरकरांनी शरद पवारांवर केला आहे. तर शिवसेना सोडताना राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते असेही केसरकरांनी एका वृत्तवहिनीशी बोलताना सांगितले आहे.

यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे.

केसरकरांनी ते राष्ट्रवादीत असतानाचा एक किस्सा सांगितला, शरद पवारांनी विश्वासात घेत राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केली होत असे सांगितले होते. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे हे मी त्यांना सांगितले नाही, असे शरद पवारांनी सांगितल्याचे केसरकरांनी सांगताना छगन भुजबळ यांना बाहेर काढत आपल्यासोबत घेतले आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाला देखील शरद पवारांचा पाठिंबा होता असा गोप्य स्फोट दीपक केसरकरांनी केला आहे.

बाळासाहेब ठाकरे असताना सर्व नेते मातोश्रीवर येत असत. मात्र शरद पवारांची ईच्छा होती की मातोश्रीने सिल्व्हर ओकवर यावे, मात्र शिवसैनिक पवारांच्या दावणीला बांधू देणार नाही. हे सर्व बाळासाहेबांना कधीही मान्य झाले नसते त्यांना मान्य नसणारी भूमिका शिवसेना घेणार नाही असे सांगताना राष्ट्रपती पदाचा उमेदवार नेहमी मातोश्रीवर येतो, मातोश्रीतील कुणी दिल्लीत जात नाही अशी महती आहे, आणि कायम रहावी असे केसरकर यांनी म्हटले आहे.