महाराष्ट्र

शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; कार्यकारणीबाबत मोठा निर्णय

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 July :- शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे शिंदे गटात इनकमिंग वाढत आहे. दुसरीकडे शिवसेनेतून गळतीचे प्रमाण वाढलं आहे. शिवसेना नेमकी कोणाची? यावरुनही आता वाद सुरू झाला आहे. शिवसेनेनी मात्र आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. जाणाऱ्यांना अडवण्यापेक्षा नवीन लोकांना संधी देण्याचं काम करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी आता शुद्धीकरम मोहिम हाती घेतल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातून याची सुरुवात करण्यात आली आहे.

शिवसेना Shivsena पक्षाच्या शुद्धीकरणासाठी कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी ही घोषणा केली.

सर्व कार्यकारणी आणि पदाधिकारी बरखास्त करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षाची पुनर्बांधणी करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. नवीन निवड करुन शिवसेनेला नवी बळकटी देणार असल्याचं ते म्हणाले. बैठकीत खासदार संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.