बीड मधील नाट्यकलावंत विनोद दळवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव
बीड : संवेदनशीलता आणि भावनाप्रधान हा कलावंताचा मूळ स्थायीभाव असतो यालाच अनुसरून समाजाविषयी कालावंत नेमीच सहानुभूती ठेवतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून बीड शहरातील उपक्रमशील,नाट्यकलावंत विनोद दळवी यांनी मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून कोरोना महामरीच्या काळात अत्यंत गरजेच्या वेळी सलग दीड महिना रोज २५० ते ३०० गरीब, अंध आणि आपंग अश्या लोकांच्या जेवणाची सोय केली.लॉकडाऊनच्या काळात बीड शहरातील गोर-गरिबांवर उपासमारीचे वाईट संकट आलेले असताताना समाज कार्यासाठी स्वतःस वाहून घेतलेल्या,कुठल्याही प्रसिद्धीची हाव नसणाऱ्या तरुणाच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन बीड येथील बुलंद क्रीडा मित्र मंडळ,रयत सामाजिक प्रतिष्ठान व मौलाना आझाद सेवा भावी संस्था बीड या दोन्ही संस्थेने नाट्यकलावंत विनोद दळवी यांच्यासह मानव ग्रुपच्या संपूर्ण परिवाराला सन्मानपत्र देवून हृदय सत्कार केला केले आहे.विनोद दळवीं आणि त्यांच्या पूर्ण परिवारासह मित्र शेखर जवकर, सुरेश वेवाहरे, अनिता लक्ष्मीकांत दोडके, आशा बाई दळवी ,जणू दळवी यांनी संकटाच्या काळात गारवंतांना केलेल्या सहकार्याचे कौतुक बीड शहरात सर्वत्र करण्यात येत आहे.