बीड

लोकशाहीचा दर मिनिटाला खून; मातोश्रीवरील बैठकीनंतर राऊतांचा हल्लाबोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 July :- उद्या न्यायालयात सुनावणी आहे. त्यात आम्हाला न्याय मिळेल. कायदेशिर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. कुणावर कसे दबाव सुरु आहे, कायद्याची पायमल्ली होत आहे, लोकशाहीचा मिनिटा-मिनिटाला खून होत आहे, अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

राऊत म्हणाले, आम्ही सदैव शिवसेनेसोबत आहोत. बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आमच्यासाठी आई आहे. सत्ता असो की नसो आमचे मातोश्रीसाठी अतूट आहे अशी भूमिका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली. मातोश्रीवर शिवसेनेची आज बैठक झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले, कायदेशिर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. कुणावर कसे दबाव सुरु आहे, कायद्याची पायमल्ली होत आहे, लोकशाहीचा खून करण्यासाठी मिनिटा-मिनिटाला खून होत आहे.

राऊत म्हणाले, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आमाला माहिती आहे की, न्यायव्यवस्थेवर किती दबाव आहे, पण हे उद्या कळेल की या देशातील न्याय व्यवस्था आणि लोकशाही स्वतंत्र आहे की नाही.

राऊत म्हणाले, मातोश्रीवर रोजच पंधरा-पंधरा तास बैठक सुरु आहेत. प्रत्येक विभागातून प्रत्येक जिल्हाप्रमुख येतात आणि भेटतात. आम्ही त्यांच्याशी चर्चा करीत आहोत. शिवसेना जागेवरच आहे. शिवसेना, शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आहे तेथेच आहे. ​​​​​​मातोश्रीवरील बैठक संपली असून उद्याच्या सुनावणीत न्याय मिळेल. पक्षविभागवार मजबूत करा अशा सुचनाही दिल्या आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, आमची कायदेशिर बाजू व्यवस्थित आहे.

न्यायालयात आमची भूमिका भक्कम आहे. त्यामुळे न्यायालयात आमचाच विजय होईल. शिवसेनेच्या राज्यातील विविध विभागांमध्ये लवकरच खांदेपालट होणार आहे. शिंदे समर्थकांच्या जागी या नव्या नेमणुका होतील. येत्या महानगर पालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल सुरु आहे. त्याचाच हा एक भाग आहे.

शिंदे गटातून गेलेल्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची सेनेतील विविध पदावरुन हाकालपट्टीची व्युव्हरचना आखली जात आहे. विभाग संघटकांशी आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. कार्यकर्त्यांकडून स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली गेली. तेथे पक्ष भक्कम कसा करता येईल यावरही चर्चा करण्यात आली.