आदित्य ठाकरेंचे आवाहन! म्हणाले, बंडखोरांना माफ करण्यात येईल…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
10 July :- जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारे सदैव खुली असतील, असे वक्तव्य निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे aditya thackeray यांनी केले. राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले जात आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचे प्रेम घ्यायला आलोय. मन, ह्रद्य जोडणे जे आहे ते शिवसैनिकांसोबत आहे. ज्यांची निष्ठा उद्धव ठाकरेंवर आहे ते मातोश्रीवर येतात. ज्यांचे प्रेम असेल, जे निष्ठावान असतील. ते मातोश्रीवर येतील, त्यांना माफ करू, निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारे सदैव खुली असतील.
एकिकडे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मातोश्रीवर परतण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी आपण अद्यापही शिसेनेतच आहोत. आपण उद्धव ठाकरे यांनाच नेता मानतो अशी वक्तव्ये सुरु केली आहेत. जर उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ असे विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केले होते. तसेच आज शिवसेना आमदार संतोष बांगर यांनीही उद्धव ठाकरेंनी बोलवल्यास जाऊ असे म्हटले आहे. परिणामी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 बंडखोर आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. पुत्र आदित्य ठाकरे (हेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच मोठ्या हिमतीने मैदानात उतरले आहेत. पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड झाल्यानंतर सोबत उरलेल्या मोजक्या नेत्यांसोबत आणि असंख्य शिवसैनिकांसोबत या पितापुत्रांनी शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली आहे.