महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना 2 दिवस रेड अलर्ट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
10 July :- भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्लीयात आली आहे. तर 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि औरंगाबादमध्ये शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याचे अनुभवायला मिळाली आहे. पुण्यातील पाषाण येथे 51 मिलीमीटर पावसाची नोंद झाली मात्र त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरू होती. घाट क्षेत्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात दिसून आला. ‘आयएमडी’च्या लवासा येथील केंद्रावर 36 तासांमध्ये 325.5 मिमी पाऊस नोंदला गेला. महाबळेश्वरला शनिवारी दिवसभरात 100 मिमी पाऊस नोंदला गेला.
कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या 13 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. मात्र 10 जुलैला म्हणजे आज रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा; तर उद्या या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी साडी 24.5 फुटांवरजा ऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक मार्ग संततधारेमुळे बंद झाले आहेत.