महाराष्ट्र

शिंदेंवर घणाघात! महाराष्ट्रात सेनेचा नव्हे भाजपचाच मुख्यमंत्री

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 July :- शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीत जात नाही, एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे. मुंबईचे तुकडे करण्याचा भाजपचा विचार लपून राहिलेला नाही, त्या दृष्टीने त्यांनी काम सुरू आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मातोश्रीवर आहे, आम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी दिल्लीत जावे लागत नाही. असे स्पष्ट कारत एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना सोडली हे मान्य केले तर आमदारकी जाईल म्हणून ते शिवसेना सोडली असे सांगत नाही. शिवसेनेत आहोत असे दाखवण्यासाठी ठाकरे कुटुंबियावर टीका करू नका असे केवळ भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे गटातील लोक करत आहे. असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

बंडखोरांनी राजीनामा द्यावा आणि मग काहीही बोलावे ही आमदारकी त्यांना शिवसेनेमुळे मिळाली आहे. त्यांना शिवसेनेत रहायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बंडखोर भाजपमध्ये तन, मन, धनाने विलीन झाले आहे. त्यांनी विधान भवनात स्वत:चा वेगळा गट निर्माण केला आहे. भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर तेव्हाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, मात्र भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या चर्चेवेळी गिरीश महाजन आमच्यासोबत होते असे आठवत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपकडून बाळासाहेबांचा वारंवार अपमान होत आहे, बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली ती खोटी आहे, असे म्हणत भाजपकडून त्यांचा अपमान होत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. शिवसैनिक जोडण्यासाठी निष्ठा यात्रा नाही, ते आमच्यातच आहेत, असे म्हणताना शिवसैनिक शिवप्रेमी जनता ही आमच्या सोबतच आहे, आमदार गेले असतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने असे अनेक धक्के पचवले आहे, मात्र यानंतर शिवसेना त्या पेक्षा जोमाने आणि दुप्पट ताकदीने उभी राहिली आहे. अनेक जण सोडून गेले मात्र जनता आमच्याासोबत आहेतच. 40 आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे, नाशिकमधील दोन्ही आमदारांच्या जागेवर पुन्हा शिवसैनिक निवडून येतील असे म्हणत मुंबई, ठाणे, नाशिक मनपात शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील असे म्हटले आहे.