महाराष्ट्र

मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार

मुंबई- 8 जून पासून बेस्ट पूर्ववत होणार आहे. अत्यावश्यक सेवांसोबतच इतर नागरिकांसाठीही बेस्ट सुरु होणार आहे. राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन मधील तीन टप्प्यातील नियमावलीनुसार पुढील वर्गातील व्यक्ती बेस्टनं प्रवास करु शकणार आहे. 1. अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी (आधीही प्रवास करत होते) 2. सरकारी कार्यालयातील कर्मचारी 3. खाजगी कार्यालयातील कर्मचारी 4. दुकानदार 5. प्लंबर, इलेक्ट्रीशिअन अशा सुविधा देणाऱ्या कामगार वर्गाला प्रवास करता येणार आहे. एका सीट वर एक प्रवासी अशा रितीने 30 प्रवासी बेस्टमधून प्रवास करतील तर 5 प्रवाशांना उभं राहून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.