सिनेमा,मनोरंजन

जेष्ठ अभिनेते राज बब्बर यांना 2 वर्षांची शिक्षा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 July :- अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर यांना एमपी एमएलए कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कोर्टाने त्यांना 8500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज बब्बर सरकारी कार्यात अडथळ आणणं आणि मारहाण प्रकरणात दोषी आढळले होते. कोर्टाकडून निर्णय दिला जात असताना राज बब्बर तेथे उपस्थित होते.

2 मे 1996 मध्ये मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये एफआयआर दाखल केला होता. राज बब्बर तेथून सपातून उमेदवार होते. मतदान अधिकाऱ्याला मारहाण करण्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, राज बब्बर हे समर्थकांसह मतदान स्थळी घुसले आणि मतदान प्रक्रियेत अडथळा आणला. याशिवाय ड्यूटीवर असलेल्या लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागले. यादरम्यान श्रीकृष्ण सिंह राणा यांच्याशिवाय पोलिंग एजेंट शिव सिंह हेदेखील जखमी झाले होते.