महाराष्ट्र

राऊतांनी जनतेतून निवडून येऊन दाखवावे; आ संदीपान भुमरेंचे आव्हान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 July :- आम्ही 50 आमदार एकनाथ शिंदे सोबत गेलो आहोत.हा पक्षाविरोधात केलेला उठाव आहे.विरोधी पक्षात लोक उठाव करतात. आम्ही सत्तेच्या विरोधात पक्षातल्या लोकांनी केलेला हा उठाव आहे. संजय राऊत आमच्यावर टिका करतात.मात्र संजय राऊत यांच्यात धमक असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि जनतेमधून निवडून यावेत अशी टीका माजी रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी दिव्य मराठीशी बोलतांना दिली आहे.

भुमरे म्हणाले की, आम्हाला ही युतीच मान्य नव्हती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत होते म्हणून आम्ही सहन केले. तीन वर्षात वाईट अनुभव आले त्यामुळे उठाव करावा लागला. आम्ही शिवसेनेत आहोत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबत मी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्याच्याकडे मी भेटूनही तक्रा केली होती. फक्त बाहेर मी सांगत नव्हतो. एकनाथ शिंदे साहेबांना सतत सांगत होतो. वेळोवेळी मी स्वत: निधी मिळत नसल्याची कल्पना दिली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले,.माझ्या बाबतीच नाही तर सर्वच बाबतीत दुर्लक्ष केले. एकटा मी नाराज असू शकतो समजु शकलो असतो पन्नास जण नाराज असू शकत नाही.

निधीचा विषयाबाबत आम्ही वर्षावर फोन करायचे दोन तीन दिवस फोन निरोप येत नसे. केवळ कळवतो असे निरोप यायचे. पक्षप्रमुख असतांना वेगळे मात्र मुख्यमंत्री असताना आम्हाला वेळ द्यायचा तो मिळाल नाही. माझ्या सोबत अनेक वेळा हा प्रसंग घडला मात्र हे मी कधी बाहेर सांगितले नाही.

मी उद्धव साहेबांना सांगितले लोक नाराज होत आहेत. खैरे यांनी केलेल्या टिकेबाबत भुमरे म्हणाले खैरेचे आरोप गंभीरतेने घ्यायचे नसतात.ते काय बोलतात त्यांनाच कळत नाही.सात हजार कोटीचा त्यानी आरोप केला. त्यांना सात हजार कोटी लिहून दाखवावे.त्यांना ते देखील लिहीता येणार नाही. त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही.