महाराष्ट्र

वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 July :- पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा किेली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोलमाफी करण्यात आल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या व्यक्तींपेक्षा वारकऱ्यांची काळजी घ्यावी असे मत मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केले आहे. ​​​​​​​​​​​​​​

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

दोन वर्ष झाली कोरोनानं वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाला जाता आले नव्हते. त्यामुळे यंदा वारकरी मोठ्या उत्साहात वारीत सहभागी झाले आहेत. याच अनुषंगाने आषाढीला पंढरपुरात मोठी गर्दी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा स्थितीत योग्य नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, औषधे, साफसफाई, टॉयलेट, रस्ते सफाई, ही व्यवस्था चांगली झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच यात अधिक भर घालावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मोबाईल टॉयलेट , चेंजिंग रुम्स, रुग्णवाहिका यासाठी गरज असल्यास बाहेरुन मदत घ्या असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे.

ठाण्यातील काजूपाडा परिसरात काल एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला. खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा तोल जात तो कोसळला आणि मागून येणाऱ्या एसटी बसने त्याला चिरडल्यांची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचे पुन्हा माझ्या कानावर येता कामा नये, अशी सक्त ताकीद शिंदे यांनी प्रशासनाला दिली आहे.