महाराष्ट्र

अमृतांचा गौप्यस्फोट! शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीस रात्री…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 July :- राज्यातील सत्तांतर काही एका रात्रीतून घडले नाही. मागील दीड वर्षांपासून त्याची पटकथा लिहिली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः विधानसभेत याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. “देवेंद्र रात्रीच्या वेळी वेशांतर करून घराबाहेर पडायचे. ते चष्मा व हुडी घालून जात असत. त्यामुळे बऱ्याचदा मलाही ते ओळखायला येत नव्हते. मी त्यांना ‘तुमचे काय सुरू आहे’ असे विचारले तर ते कोणतेही उत्तर न देता काढता पाय घ्यायचे,” असे अमृता यांनी म्हटले आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी अमृता फडणवीस यांनी वार्तालाप केला. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतरासोबतच, भाजप परत सत्तेत येण्याची शक्यता वाटत होती असे म्हटले. अमृता फडणवीसांनी​ म्हणाल्या, मला देवेंद्र यांच्याकडून एक अपेक्षा होती की, त्यांनी सेवा करावी. ते कोणत्याही पदावर असले तरीही ते सेवा करीत आहेत. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. अशा प्रकारे ते येतील असे मला वाटत होते.

अमृता म्हणाल्या, राज्याची स्थिती कोलमडणे, इगो राईट्स, लोकांची घरे तोडणे, हनूमान चालिसा, लोकांच्या समस्या, एसटी कर्मचारी असो की ओबीसी आरक्षण आदी विविध कारणे असो त्यामुळे मलाही भाजपची सत्ता परत येणार हे वाटतच होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून ते येतील असे सर्वांनाच वाटत होते, पण ते उपमुख्यमंत्री झाले. त्यावर अमृता म्हणाल्या की, मला थोडे आधीपासून समजले होते की, देवेंद्र मुख्यमंत्री होणार नाही. त्याशिवाय ते कोणतेही पद स्वीकारणार नाही हेही मला माहित होते.

अमृता म्हणाल्या, मला गर्वही वाटत होता की, एकनाथ शिंदे यांना जेही ओळखतात ते चोवीस तास अविरत काम करतात. ते सुद्धा देवेंद्र यांच्यासारखेच सेवक आहेत. त्यामुळे दोघे पदावर असो की नसो ते एकत्रित खूप चांगले काम करणार आहे याची शाश्वती होती त्यामुळे देवेंद्र कोणते पद घेत आहेत अथवा नाही याचा काहीही फरक पडणार नव्हता.

अमृता म्हणाल्या, गेली दीड वर्षे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र शिंदे एकमेकांना रात्री भेटत होते अशी स्पष्टोक्तीच एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यावर देवेंद्र खूप उशिरापर्यंत काम करतात. ते चष्मा आणि हुडी घालून बाहेर पडायचे. त्यामुळे मलाही ओळखायला येत नव्हते, मी त्यांना विचारायचे की, अशात तुमचे काय सुरू आहे तेव्हा ते यावर उत्तर न देता टाळून द्यायचे.

अमृता म्हणाल्या, मला थोडे वाटायचे की, काही न् काही सुरू आहे, पण ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सभागृहात याबाबतचा घटनाक्रम सांगितला त्यानंतर देवेंद्र हे काय करीत होते हे सर्वांनाच कळाले. शिवसेनेत किती अस्वस्थता आहे हे आमदारांनी सांगितल्यानंतर स्पष्ट झाले. त्या अस्वस्थतेला भाजपने मार्ग देण्याचे आणि त्यांच्यामागे उभे राहण्याचे काम भाजपने केले हे चांगलेच आहे असेही त्या शेवटी म्हणाले.

अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी पूर्वीच खूप बोलल्यामुळे नवीन काही सांगण्यासारखे नाही, असे सांगितले.ठाकरे कुटुंबीयांना आता काही सांगायची माझी ईच्छा नाही. मला जे सांगायचे होते ते मी दोन अडीच वर्षांपूर्वी खूप काही सांगितले आहे. आता प्रत्येक व्यक्ती विषयी इतकी जनजागृती झाली आहे की नवे काही सांगण्यासारखे राहिलेले नाही. मी त्यांना फक्त एवढेच सांगेन की ‘सक्षम लोक कायम टिकतात, प्रतिकूल परिस्थिती कायम राहत नाही’ अशी टीकाही त्यांनी केली.