News

वाळूच्या वाहनामुळे गेवराई तहसील कार्यालय झाले जाम

गेवराई , :- मागिल अनेक महिन्यापासून गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणारे वाहने हे दंडापायी तहसील कार्यालयात आणून लावली जातात.ह्या वाहनांची इतक्या मोठ्या प्रमाणावर संख्या झाली की आज घडीला गेवराई तहसील कार्यालय जाम झाले आहे.यामुळे गेवराई तहसील कार्यालयात जाण्यासाठी व दुचाकी गाड्या लावण्यासाठी हे कार्यालय सध्या बंद झाले आहे.शासनाने ही कारवाई करावी याबाबत दुमत नाही माञ याच वाहनामुळे गेवराई तहसील कार्यालयात जाण्यासाठी रस्ता बंद झाल्याने गेवराई तालुक्यातील नागरिकांमधून सध्या संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान या अवजड वाहनांची गेवराई तहसील कार्यालयात  इतकी गर्दी वाढली की दस्तुरखुद्द गेवराई तहसील कार्यालयातील कर्मचारी यांना देखील या परिसरात वाहने लावण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे सध्या तरि दिसून येत आहे.     गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपसा करणारे माफिया यांच्या वाळूच्या गाड्या पकडल्यानंतर ते वाहने तत्पूर्वीचे नायब तहसीलदार तथा आजचे तहसीलदार प्रशांत जाधवर हे गेवराई तहसील कार्यालयात आणून लावत दंडात्मक कारवाई करत आहे.त्यामुळे आज घडीला या वाहनांची संख्या तहसील कार्यालयात इतकी झाली की हे तहसील कार्यालय सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनासाठी बंद होऊन जाम झाल्याचे दिसून येत आहे.अशा अवजड वाहनांचे तहसील कार्यालयातून कायमस्वरूपी हकालपट्टी करुन हे कार्यालय मोकळे करावे अशी मागणी अनेक नागरिकांनी आमचे प्रतिनिधी कैलास हादगुले यांच्याशी बोलतांना सांगितले.परिणामी आज घडीला या तहसील कार्यालयात सध्या मुंगी जाण्यासाठी देखील रस्ता नसल्याने दिसून येत आहे.मुख्य गेट पर्यंत हे वाळूचे वाहने येथे ऊभी करण्यात आल्याने हे कार्यालय सध्या वाळूच्या वाहनामुळे जाम झाले आसल्याचे दिसून येत आहे.     एकंदरीत गेवराई तहसील कार्यालयात सध्या जाण्यासाठी रस्ता शिल्लक नसल्याने तालुक्यातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मुख्य ध्वजारोहणा पासून ते संपर्ण कार्यालय परिसर या अवजड वाहनामुळे सध्या जाम झाले आहे.या कार्यालयातील या वाहनाचा बंदोबस्त करुन हे कार्यालय मोकळे करावे अशी मागणी होत आहे.याबाबत गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर यांना विचारले असता या पातळीवर आम्ही अवैध वाळू उपसा करणारे माफिया यांच्या गाड्या पकडल्या माञ अनेक जण हा दंड भरण्यास नकरता दर्शवीत आहे.परिणामी ह्या गाड्यांची येथे संख्या वाढत आहे.शासनाला या माध्यमातून मोठा महसूल मिळत आहे शिवाय वाळू माफियांना देखील चपराक मिळत आहे असे दिसून येत आहे.दरम्यान आज घडीला या तहसील कार्यालयात  या वाहनामुळे हे कार्यालय सध्या जाम  झाले आसल्याचे दिसून येत आहे.