महाराष्ट्र

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 July :- महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 25 दिवसांमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आणि अपक्ष असे जवळपास 50 पेक्षा जास्त आमदार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडापासून ते आजपर्यंत त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच आहे. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.