महाराष्ट्र

फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले उपमुख्यमंत्री होण्यात…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 July :- उपमुख्यमंत्री होण्यात कमीपणा नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. पक्षाने त्याला मान्यता दिली, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शिवसेना आमदारांचे बंड नव्हे तर उठाव होता. शिवसेना आमदारांची खदखद पहिल्या दोन महिन्यांत लक्षात आली होती. मी त्यावर नजर ठेवून होतो असे फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनच्या जोरावर बाकीचे पक्ष स्वत:चे राजकीय प्राबल्य वाढविण्यायाठी प्रयत्न करत होते.या सर्व अस्वस्थतेत त्यांनी उठाव केला आणि त्या उठावाला आम्ही साथ दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सरकारला बाहेरून मदत करण्याची मानसिकता तयार केली होती. आम्ही आग्रह घरला तर मुख्यमंत्री पद भेटले असते. मात्र, लोकांनी दाखविलेला विश्वास चोरून नेण्यात आला. यामुळे सत्तेसाठी नाही विचारासाठी आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही की हा प्रस्ताव मी केंद्राकडे नेला होता. असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, सत्ता बाहेर राहून चालत नाही, घटनाबाह्य सत्ताकेंद्र असणे पक्षालाही मान्य नव्हते. त्यामुळे मोदी, शहा यांनी मला सरकारमध्ये राहाण्यास सांगितले. मला यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली यात कोणताही कमीपणा नाही. एकनाथ शिंदेंना सफल मुख्यमंत्री करण्यात मी विशेष प्रयत्न करणार आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पद स्वीकारले. फडणवीस म्हणाले की, विदर्भ – मराठवाड्यासह मागास भागाचा विकास होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. आणि विदर्भ तर आमच्या अजेंड्यावर आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरातच होईल.

फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांचे सुपूत्र म्हणून वारसा उद्धव ठाकरे यांचा असला तरी विचारांवर उभी राहिलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. कौटुंबिक वारसा असला तरीसुद्धा वैचारिक वारसा महत्वाचा आहे. मात्र यावर आपण अधिक काही बोलणार नाही.

फडणवीस म्हणाले, शिवसेना संपवायला कोण निघाले आहे हे बंडखोर शिवसेना आमदारांनी वारंवार सांगितले आहे. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांना हे कळत नसेल तर ईश्वरच जाणो. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करू. एका व्यक्तीने महाराष्ट्राचे राजकारण कलुषित केले आणि येथील सुसंस्कृतपणा खड्ड्यात घातला अशी टीका संजय राऊत यांचे नाव न घेता केली. मंत्रिमंडळ स्थापन करण्याबाबत सध्या काहीही ठरलं नाही. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

2019 मध्येच भाजपा आणि शिवसेना युतीला लोकांनी निवडून दिले होते. मात्र, काही लोकांनी साथ सोडत अनैसर्गिक युती केली. सर्व चांगले निर्णय थांबवण्यात आले. यात विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय केला. त्यांची वैधानिक विकास मंडळ बंद केली. यासर्व गोष्टींचे सर्वांत जास्त झाले. सत्ता गेल्याचे नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.