महाराष्ट्र

आषाढी महापूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Jun :- यंदा १० जून रविवारी आषाढी एकादशी आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच जल्लोषात वारी होत असल्यामुळे वारकरी आनंदात आहेत. दरवर्षी पंढरपुरातील पांडुरंगाची पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यावर्षी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा केली जाणार आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

“पूजेसाठी नक्की उपस्थित राहू आणि पंढरपूर मंदिर समितीला लागेल ती मदत करू”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी समितीच्या सदस्यांना आश्वस्त केले. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी श्री.गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.