महाराष्ट्र

मी पुन्हा आलो आणि… फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 July :- मी पुन्हा येणार असे म्हटले होते. त्यावरून माझी खूप टिंगळटवाळी करण्यात आली. पण, मी पुन्हा आलो, यावेळेस मी एकटा आलो नाही तर एकनाथ शिंदे यांनासोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंगल, टवाळी केली, त्यांचा सर्वांचा मी बदला घेणार आहे. माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केले. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानी बसवले, त्यांनी घरी बसवले असते, तरी आदेश मान्य केला असता, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री असा उल्लेख करत अभिनंदन केले. यावेळी आमदारांनी सेना-भाजप युतीचा विजय अशी घोषणाबाजी केली. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी बाहेर राहून मदत करणाऱ्या अदृश्य हातांचेही आभार, असे फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप सभागृहाबाहेरच असल्याने त्यांना मतमोजणीला उपस्थित राहता आले नाही. त्यांना फडणवीसांना टोला लगावला.

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक आणि कर्मावर त्यांची निष्ठा असून संघटक आणि जनतेचे सेवेकरी आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोघांच्या प्रभावामुळे 80 च्या दशकामध्ये त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम सुरू केले. एक साधा कार्यकर्ता, शाखा प्रमुख ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मुख्यमंत्री झालेत. आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर शाखा प्रमुख म्हणून निवड केली. या नंतर दिघे साहेबांच्या नेतृत्त्वात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. सामान्याला न्याय देण्यासाठी ते आंदोलन करायचे.

फडणवीस पुढे म्हणाले की, 2004 नंतर सलग चार वेळा ते आमदार झाले. मागच्या काळात मंत्री म्हणूनही त्यांनी माझ्यासोबत काम केले. या काळात सीमा प्रश्नावर जे काही आंदोलन झाले. या आंदोलनावर एक नेता म्हणून त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. 40 दिवस बेल्लारीच्या जेलमध्ये ते राहिले. त्यातूनच एक मोठे व्यक्तीमत्व तयार झाले. 1097 साली ठाण्यात नगसेवक, मनपा सभागृह नेते, आमदार, जिल्हाप्रमुख झाले.

राज ठाकरे यांचे अभिनंदन पत्र आणि राष्ट्रवादी प्रमुख शरद पवारांनी देवेंद्र यांचा केलेला संघस्वयंसेवक असा उल्लेख यावर फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे की शरद पवार यांनी देखील संघ, संघाची भूमिका आणि संघाची शिस्त याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी माझा उल्लेख गौरवपूर्ण केला त्याचा मला आनंद आहे. त्यांनी मला संघस्वयंसेवक म्हटले, हो मी संघस्वयंसेवक आहेच.

मी त्यांचे मनापासून आभार मानतो. राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिले. खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायचा विचार केला, पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. म्हणून मग मी फोन करून त्यांचे आभार मानले. राज ठाकरे यांची अजूनही तब्येत बरी नाही. ते नुकतेच रुग्णालयातून बाहेर आलेत. घरीच आहेत. मी त्यांची भेटही घेणार आहे.

विरोधकांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, सत्ता येते आणि जाते, त्याचा अहंकार येता कामा नये. प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे की जो निवडून येतो, त्याला परत पाच वर्षानंतर परिक्षा द्यावीच लागते. कोणीही असो प्रत्येकाने हे लक्षात ठेवावे. कारण, परत लोकांना उत्तर द्यावे लागणार आहे. आमचे सरकार कोणत्याही बदल्याच्या भावनेने काम करणार नाही. मागच्या सरकारचे जे चांगले निर्णय आहेत ते पुढे कायम करु. या संपूर्ण वाटचालीत एक सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला.

एकनाथ शिंदे हे 24 बाय 7 काम करणारा नेता आहे. शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेते आहेत. ते एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता…