महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तीन मोठ्या घोषणा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 July :- विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सोमवारी बहुमताची लढाई शिंदे सरकारने जिंकली. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने 164 मते मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. तसेच यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

जागतीक बाजारात तेलाच्या किंमती वाढल्यावर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय कर कमी केला होता. पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. केंद्रानंतर काही राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल- डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ज्या हिरकणीने रायगड वाचवा आणि इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचा घटक शेतकरी आहे. बांधावर सगळेच लोक जाऊन, त्याची विचारपूस करतात. तर या शेतकऱ्याच्या जीवनात देखील सुखाचे क्षण यावेत म्हणून राज्य सरकार ऐवढे करेल की, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. यासाठी विरोधी पक्षांचं सगळ्यांचं योगदान आणि सहकार्य आम्हाला लागेल. सत्ताधारी व विरोधी पक्षाने हातात हात घालून काम करुयात, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प केला. ते म्हणाले की, आम्ही 50 जण आहोत, प्रत्येक जण लाखो मतs घेऊन निवडून येतात, सगळ्यांकडे कार्यकर्ते आहेत, सगळे दबंग आहेत. पण ते शस्त्र आम्ही बाहेर काढले नाहीत. कधीच रक्तपात होऊ देणार नाही. पण एका मर्यादेपेक्षा जास्त कधीच सहन करता येत नाही. मुख्यमंत्री झालोय हेच मला अजून कळत नाही. आता मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे फाईलवर तपासून अहवाल सादर करा असे चालणार नाही. आमदार पत्र घेऊन आले की थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आदेश करणार.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.