महाराष्ट्र

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चीनलाही मागे टाकू शकतो महाराष्ट्र

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 2 लाख 36 हजार 657 झाली आहे. रुग्णांच्या संख्येत भारताताने आता इटलीला पछाडले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारत जगात चौथे क्रमांकावर पोहोचला आहे.गेल्या 24 तासांत देशात एकूण 9887 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र आता एकूण रुग्णांच्या बाबतीत चीनलाही मागे टाकणार आहे.महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 80 हजारांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2436 नवे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी तर महाराष्ट्रात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 80229 झाली आहे. पुढील दोन- तीन दिवसांत महाराष्ट्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबत चीनला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण (Recovery Rate) 43.81 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के आहे.