मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
3 July :- औरंगाबाद जिल्ह्यात 3 जुलैपर्यत 145 मिमी पाऊस झाला आहे. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गेल्या महिन्याभरापासून जायकवाडी धरणात 45 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. मात्र मराठवाड्यातल्या अकरा प्रकल्पापैकी चार प्रकल्पात पाण्याची आवकच झालेली नाही. यामध्ये मांजरा मानार निम्न तेरणा आणि सिनाकोळेगाव या प्रकल्पात अजूनही पाण्याची आवक महिना झाली तरी आलेली नाही. मराठवाड्यात 149 मिमी सरासरी पाऊस झाला असून मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.
मराठवाड्यात आत्तापर्यत सरासरी 149 मिमी पाऊस झाला आहे. फारसा मोठा पाऊस झालेला नसल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यत सर्वाधिक 162 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 113 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यातल्या सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सध्या केवळ 33 टक्के पाणीसाठा आहे.यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 733 दलघमी तर एकुण पाणीसाठा 1471 दलघमी इतका आहे. आत्तापर्यत जायकवाडीत केवळ 45 दलघमी पाण्याची आवक झाली आहे.तर दुधना धरणात आत्तापर्यत केवळ चार दलघमी पाण्याची आवक झाली आहे.
दुधना प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 140 दलघमी असून एकूण पाणीसाठा 242 दलघमी इतका आहे. हे प्रमाण ५७ टक्के इतके आहे. तर येलदरी प्रकल्पात केवळ 9 दलघमी इतके पाणी आले आहे. येलदरीमध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा 435 दलघमी इतका असून 53 टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्वर प्रकल्पात 11 दलघमी पाण्याची आवक आली असली तरी या प्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. तर माजलगांव प्रकल्पात 17 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 97 दलघमी असून हे प्रमाण 31 टक्के इतके आहे.
तर मांजरा मानार सिनाकोळेगाव प्रकल्पात अजूनही पाण्याची आवक झालेली झालेली नाही.मांजरात केवळ 49 दलघमी पाणी असून हे प्रमाण 27 टक्के इतके आहे. पैनगंगा प्रकल्पात 42 दलघमी पाण्याची आवक झाली असून 494 दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा असून हे प्रमाण 51 टक्के आहे.