महाराष्ट्र

पवारांची जोरदार बॅटींग; सभागृहात पिकला हशा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July :- कशामुळे घडले? काय घडले? हे एकनाथ शिंदेंनी मला कानात जरी सांगीतले असते आणि​​मुख्यमंत्रीपद हवे असे म्हटले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना मुख्यमंत्री केले असते. अशा मिश्किल ढंगात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. त्यावेळी सभागृहात मोठा हशा पिकला. विशेष म्हणजे पवारांनी आज उपमुख्यमंत्री फडणवीस, शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकरांसह भाजमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार, नेत्यांनाही शाल-जोडीतून फटके मारले विशेष म्हणजे नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरही यातून सुटले नाही.

अजित पवार म्हणाले की, राहूल नार्वेकर हे आधी शिवसेनेत होते. त्यांनी आदित्य ठाकरेंसोबत काम केले. आम्हीही अशा लोकांवर लक्ष ठेवून असतो. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार मला हवा होता. मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी उमेदवारी स्वीकारली पण मोदी लाटेत त्यांची हार झाली. ते हुशार आहेत की माझी हार झाली तर कोणते तरी सदस्यत्व द्यावे त्यांची हार झाल्यानंतर आम्ही त्यांना विधान परिषदेवर सदस्य केले.

अजित पवार म्हणाले, सर्वच पक्षात राहूल नार्वेकर यांनी उत्तम काम केले. एका गोष्टीचे मनापासून कौतूक आहे की नार्वेकर ज्या पक्षात गेले त्या पक्षाच्या नैतृत्वाला आपलेसे करीत असतात. शिवसेनेत आदित्य, राष्ट्रवादी मला आणि भाजपमध्ये फडणवीसांना नार्वेकरांनी आपलेसे केले. हयगय केली नाही आता एकच की मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आपलेसे करा अन्यथा त्यांचे काही खरे नाही असा टोला त्यांनी लगावला. भाजपच्या गणेश नाईक, गीरीष महाजानांसारख्या बड्या नेत्यांना जे जमलं नाही ते आमच्या राहूल नार्वेकरांनी करुन दाखवले. मी आधीच भाजपला सुचवले होते की, त्यांना अध्यक्ष करा, गमतीचा भाग जाऊद्या.

जावयाने आमचा हट्ट पूरवावा, सासरच्या पक्षावर अन्याय होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. एकीकडे जावई आणि एकीकडे सासरे अशी राज्याच्या राजकारणात निराळी गोष्ट घडली आहे असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. कायजद्याचा अभ्यास असणारे राहूल नार्वेकर सर्व पक्षात नार्वेकरांनी उत्तम काम केले असेही अजित पवार म्हणाले.

गिरीश महाजानांवर कोपरखळी मारताना अजित पवार यांनी अभिनय करुन डोळे पुसले. फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही हे ऐकूण तर गिरीश महाजन रडायलाच लागले. त्यांच्या डोक्यावर फेटा बांधला होता त्याच फेट्याने ते डोळे पुसत होते अशी मिश्किल बाबही त्यांनी सांगीतली. खऱ्या अर्थाने त्यांना वाईट वाटले पण आता काय करता…?

अजित पवार म्हणाले, भाजपच्या जून्या, जाणत्या माणसांची संधी गेली. भाजप सत्तेत येण्याची शक्यता नव्हती पण मोदींची जादू चालली आणि भाजप सत्तेत आला. मुळचे भाजपचे मान्यवर समोरच्या बाकावर कमी आणि आमचेच लोक जास्त दिसतात. मुळ भाजपच्या लोकांना पाहून वाईट वाटते. कारण त्यांना बाजूला सारून भाजपमध्ये गेलेल्या आमच्या बहुतांशी मंडळींनी पद पटकावली असे सांगताच सभागृहात हशा पिकला.