महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर तोफ; आता कुठे पळणार?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July :- शिवसेनेचे बंडखोर आमदार आज विधानसभेच्या सभागृहात कडेकोट बंदोबस्तात दाखल झाले. यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली. मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी कसाबलाही एवढी सुरक्षा पाहिली नाही. बंडखोर आमदारांना आता नेमकी कशाची भीती वाटत आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

शिवसेनेचे आमदार विधानसभा सभागृहात बंडखोर शिवसेना आमदारांशी भिडतील, अशी शक्यता सकाळपासून वर्तवली जात होती. मात्र, सभागृहात असे काहीही घडलेले नाही. शिवसेनेचे बंडखोर आमदार भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान देण्यासाठी उभे राहिले, त्यावेळी काही शिवसेना आमदारांनी घोषणाबाजी केली. एवढी गोष्ट सोडली तर संपुर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना खासगी बसमधून विधानभवनात आणण्यात आले. त्यानंतरही त्यांच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावर अतिरेक्यांनाही एवढी सुरक्षा पाहिली नाही. त्यांना आताही कुठे पळवून नेणार आहात की आमदार कुठे पळून जाण्याची भीती वाटते, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. विधानभवनात आमदारांसाठी सरकारचीच कडेकोट सुरक्षा असते. असे असूनही बंडखोर आमदारांसाठी वेगळा बंदोबस्त का ठेवला. त्यांना नेमकी कशाची भीती वाटते, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

शिवसेनेने व्हीप जारी करुनही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मत दिले. त्यावर बंडखोरांनी आज नैतिकताही घालवली. सभागृहात ते आमच्याकडे पाहूदेखील शकले नाहीत. आता मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जाणार, अशी टीका केली.

एकनाथ शिंदे यांचे नवे सरकार येताच मेट्रो कारशेड आरे वसाहतीत बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली. आरेचे जंगल मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कारशेडसाठी कांजूरमार्ग, पहाडी गोरेगाव अशा पर्यायी जागेचा विचार मविआने केला होता. असे असतानाही केवळ आमच्यावर राग म्हणून पुर्वीच्या सरकारचा निर्णय बदलू नका. आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका. आरेचे जंगल अबाधित ठेवा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

आजच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने जारी केलेला व्हीपच अधिकृत आहे. त्यामुळे आज बंडखोरांनी केलेले मतदान ग्राह्य धरायचे की नाही, याबाबत आम्ही दाद मागू, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले. नार्वेकर आणि आपण एकेकाळी मित्र होतो. त्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल आनंद झाला, असे ठाकरे म्हणाले. तसेच, विधानसभेत ते सर्वांना बोलण्यासाठी समान संधी देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.