बीड

विधिमंडळात फॅमिली राज; सासरा सभापती, जावई विधानसभा अध्यक्ष

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July :- महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्याचा दुर्मिळ योग घडून आला आहे. राहुल नार्वेकर विजयी झाल्याने सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधी मंडळावर पाहायाला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती म्हणून जावई आणि सासरे अशी जोडी काम करणार आहे.

आज राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 146 मते पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात 107 जणांनी मतदान केले. समाजवादी पक्षाचे दोन आमदार आणि एमआयएमचा एक आमदार तटस्थ राहिले आहेत. यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा करत नार्वेकर यांच्या नावाची घोषणा केली.

राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपची वाट धरली होती.

राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. सातारा जिल्ह्यातील निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29 वे वंशज आहेत. ते 1995 साली सर्वप्रथम फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निंबाळकरांनी 22 अपक्षांना एकत्र करत तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला होता. युती सरकारच्या त्या राजवटीमध्ये निंबाळकर हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते.

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर निंबाळकर यांनी त्या पक्षात प्रवेश केला. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये आधी राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी सांभाळले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2010 साली सर्वप्रथम विधान परिषदेवर संधी दिली. सध्य ते विधान परिषदेचे सभापती आहेत.